Home क्राईम दीड वर्षांच्या चिमुकलीसह आई आणि मावशी बेपत्ता !

दीड वर्षांच्या चिमुकलीसह आई आणि मावशी बेपत्ता !

0
309


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून एक महिला आपल्या दोन मुलींना घेऊन घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. यात २२ वर्षीय विवाहित मुलगी, तिची दीड वर्षाची लहान मुलगी आणि तिची १७ वर्षीय अल्पवयीन बहिण यांचा समावेश आहे. या तिघीही कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील भापसानगर भागात राहणाऱ्या मंगलाबाई समाधान वंजारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मोठी मुलगी सीमा समाधान वंजारी (वय २२), तिची दीड वर्षाची मुलगी निधी शुभम कापसे (वय १ वर्ष ६ महिने) आणि फिर्यादीची लहान मुलगी दिपाली समाधान वंजारी (वय १७) अशा तिघीही घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्या बेपत्ता झाल्याचे मंगलाबाई यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ याची नोंद घेतली. पोलीस हवालदार ईश्वर छगन लोखंडे यांनी तक्रार दाखल करून घेतली आ


Protected Content

Play sound