अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातून चोरलेल्या आठ मोटारसायकली पोलिसांनी नाशिक येथे गुन्हा दाखल असलेल्या चोरट्याकडून जप्त केल्या आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, अमळनेर तालुक्यात अलीकडच्या काळात मोटारसायकली चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. पोलीस पथक याबाबत तपास करत होते. दरम्यान, पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना नाशिक येथील मोटारसायकल चोरीच्या तपासात अमळनेर तालुक्यातील मुळचा रहिवासी असलेल्या चेतन कमलाकर पाटील ( रा. भरवस, ता. अमळनेर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.
यानंतर जयपाल हिरे यांनी आपल्या सहकार्यांना पाठवून चेतन पाटील याला ताब्यात घेतले असता त्याने तालुक्यात मोटारसायकलींची चोरी केल्याचे मान्य केले. यासोबत त्याने एकूण २ लाख ३३ हजार रूपये मूल्य असणार्या आठ मोटारसायकली आणून दिल्या.
सदर कारवाई पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, मिलींद भामरे, सुर्यकांत साळुंखे, सिध्दांत सिसोदे आणि गणेश पाटील यांच्या पथकाने केली.