जळगाव प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव कार्यालयातर्फे तालुकानिहाय वर्षभर मासिक दौरा आयोजित करण्यात येत असतो. चाळीसगाव येथे परिवहन विभागाचा येत्या ३० डिसेंबर रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मोटार वाहनधारक नागरिकांची कामे वेळेवर होण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी दिनांक 30 डिसेंबर, 2020 रोजी चाळीसगाव विश्रामगृह येथे अतिरिक्त मासिक दौरा (अनुज्ञप्ती) साठी आयोजित करण्यात आला आहे. असे शाम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.