अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेसोबत अश्लिल कृत्य करत हात पकडून विनयभंग केल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकऱ्या चारून आपला उदरनिर्वाह करते. बुधवारी १९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता महिला ही आपल्या बकऱ्या घेवून आसरा माता मंदीर परिसरात आलेली होती. त्यावेळी गावात राहणारा अजय कैलास पाटील हा तिथे आला. महिलेसोबत अश्लिल कृत्य करत तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता अजय कैलास पाटील रा. भुसावळ याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह ह्या करीत आहे.

Protected Content