वाघ नगर येथे तरूणीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगर येथे सोबत चल असू सांगून २० वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, वाघ नगर परिसरात राहणारी २० वर्षीय तरूणी ही आपल्या आईवडीलांसह राहते. २१ मार्च रोजी सकाळी ११  वाजेच्या सुमारास ओळखीची वैष्णवी ईश्वर पाठक रा. वाघ नगर हीने तरूणीला वाघ नगरच्या थांब्याजवळ बोलावून घेतले. माझ्यासोबत चल असे सांगून तरूणीला दुचाकीवर वसवून घेवून सार्वजनिक ठिकाणी नेले. त्याठिकाणी तुषार प्रभाकर रोडे रा. सावखेडा ता. रावेर जि.जळगाव हा हजर होता. त्यावेळी वैष्णवीने तुषारशी ओळख करून प्रलोभण दाखवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे. 

 

jalgaon live news, jalgaon news update, jalgaon news, jalgaon update, live news,  livetrends, livetrendsnews jalgaon crime news, jalgaon crime news 

Protected Content