किनगाव येथे तरूणीचा विनयभंग; यावल पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव गावात सार्वजनिक ठिकाणी एका व्याक्तीने महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव येथे १४ जानेवारी रोजी रात्री किनगाव गावातील रमेश विकास कोळी यांच्या घरासमोर प्रदीप ईच्छाराम कोळी यांनी एका २३ वर्षीय फिर्यादी महीले सोबत असलेल्या तरुणीस रस्त्याने जातांना धक्का मारून तिचा हात धरून तरूणीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत केले. याबाबत त्या तरुणीच्या नातेवाईक महीलेने १५ जानेवारीस पोलीसात  फिर्याद दिल्याने यावल पोलीसात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनिल तायडे हे तपास करीत आहे. दरम्यान या घटनेमुळे एका गटाकडून गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रदीप कोळी व पत्नीस बेदम मारहाण झाल्याने ते दोघही जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असुन, संशयीत आरोपीच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

 

Protected Content