यावल प्रतिनिधी । शहरात सहा जणांकडून महिलेचा विनयभंग व मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात फिर्यादी महिलेने दिली आहे. याप्रकरणी यावल पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आदेशान्वये सहा जणांविरोधात विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील विरारनगरातील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५ मे रोजी सायंकाळी शहरातील विरारनगर भागात राहात्या घरात संशयित आरोपी १. सुभान समशेर तडवी, २.आमीन सुभान तडवी, ३.सलीम सुभान तडवी रा.ठाणे, ४.तसलीम सुभान तडवी रा.यावल, ५.जैतून सुभान तडवी,रा.यावल, ६.नसिर उखर्डू तडवी रा.ईचखेड़ा असे आरोपींचे नावे असून तालुका यावल हे त्यांचे हातात लाकडी पट्ट्या घेऊन घरात घुसून म्हणाले की मनोज कुठे (फिर्यादीचा मुलगा मनोज) असे विचारले त्याला बाहेर काढा म्हणत आरोपींनी विनयभंग करत मारहाण केली.
तेव्हा सलमान रहेमान पटेल, शेख बसीम अब्दुल गफूर, मेहमूद हबीब तडवी, अजीत अरमान तडवी, शब्बीर इस्माईल तडवी यांनी मला व माझा मुलगा मनोज यास आरोपींच्या ताब्यातून सोडविले. तेव्हा आरोपींनी आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादी महिलेने घटनेच्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन लेखी व तोंडी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र पोलिसांनी त्यावेळेस गुन्हा दाखल केला नसल्याने फिर्यादी महीलेने येथील न्यायालयात धाव घेतल्याने अखेर यावल पोलीसांनी भाग ५ गु.र.नं. १३२/२०२१भा.द.वि. कलम३५४, ४५२, १४३, १४७, ३४१, ३२५, ३२४, ३२३,, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे ६आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण करीत आहे.