Home क्राईम यावल येथे महिलेचा विनयभंग; एकाला अटक

यावल येथे महिलेचा विनयभंग; एकाला अटक

0
26
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence

यावल प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी ३१ वर्षे महिला आपल्या कुटुंबियांसह राहते.  महिलेचे कटलरीचे दुकान आहे.  कटलरी माल विकून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुकानावर असताना संशयित आरोपी पंकज रमेश सोनवणे (वय-३१) रा. वढोदा ता. यावल हा महिलेच्या दुकानावर आला. त्याने आठ दिवसांपुर्वी घेतलेली वस्तू परत करण्यासाठी आला. यात वाद झाल्यानंतर त्याने महिलेला एक मोबाईल नंबरची चिठ्ठी दिली. तसेच म्हणाला की, ‘माझ्याशी मैत्री करश्‍ असे सांगून त्याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने यावल पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ असलम खान दिलावर खान करीत आहे.


Protected Content

Play sound