
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव टाकून तिचा हात पकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव याने पिडीत मुलीचा पाठलाग करत तिच्या सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. याला पिडीत मुलीने नकार दिला. दरम्यान बुधवार ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता पिडीत मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. हाप्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.


