जळगाव प्रतिनिधी । विवाहितेने लग्नाआगोदर केलेल्या कामाचा पगार आणि सोन्याचे दागिने आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ करून दीराकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा जळगाव शहरातील एका परिसरात राहणार्या मुलासोबत विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्यांनी तिने माहेरुन विवाहितेने लग्नाआधी कमविलेला पगार आणावा, सोन्याचे ब्रासलेट आणावे या कारणावरुन छळ केला. तसेच वेळावेळी छळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यादरम्यान विवाहितेच्या पतीच्या भावाने एके दिवशी विवाहितेसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अशा प्रकारच्या विवाहितेच्या तक्रारीवरुन तिचे पतीसह सासरच्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीष हाळनोर हे करीत आहेत.