Home आंतरराष्ट्रीय इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोज्तबा खामेनेई यांचे नाव घोषित

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोज्तबा खामेनेई यांचे नाव घोषित


तेहरान- वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाने धोकादायक वळण घेतले असून इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर थेट हल्ले करण्यात आल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही तासांतच नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा, पुन्हा त्यांच्यावर हल्ला आणि अखेर मोज्तबा खामेनेई यांची निवड या घडामोडींमुळे इराणमध्ये अभूतपूर्व अस्थिरता निर्माण झाली आहे.

अमेरिका आणि Israel यांच्या निशाण्यावर सध्या इराणचे सर्वोच्च नेतृत्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त हवाई हल्ल्यात Ali Khamenei यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यात ते ठार झाल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. युद्ध सुरू होऊन 24 तास पूर्ण होण्यापूर्वीच हा मोठा धक्का बसल्याने इराणच्या सत्ताकेंद्रात खळबळ उडाली.

खामेनेई यांच्या निधनानंतर इराणकडून तातडीने सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. Ali Reza Arafi यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड जाहीर करण्यात आली; मात्र निवड झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्यावरही हल्ला झाला आणि ते ठार झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे इराणमधील राजकीय आणि धार्मिक नेतृत्वावर थेट धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर इराणने आणखी एक मोठा निर्णय घेत Mojtaba Khamenei यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून घोषणा केली. अमेरिका-इस्रायल संयुक्त कारवाईत इराणच्या सत्ताकेंद्राला लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. इराण आपल्या इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात असल्याची चर्चा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे.

इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू असून शाळा, सरकारी इमारती आणि लष्करी तळ लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे. या संघर्षात निष्पाप नागरिकांचा बळी जात असून लहान मुले आणि महिलांवरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. इराणकडूनही प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू असून दुबई, कतार आणि कुवेतमधील अमेरिकन दूतावासांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ल्यांमुळे इराणची दळणवळण व्यवस्था आणि शासकीय प्रणाली विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, नाटो देशांनी अमेरिकेला पाठिंबा जाहीर केला आहे. कोणताही देश थेटपणे इराणच्या बाजूने उभा नसल्याचे दिसत असले तरी China आणि Russia यांनी अमेरिकेच्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. मात्र इराणला थेट लष्करी मदत देण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली नाही.


Protected Content

Play sound