रावेर प्रतिनिधी । कोरोना’चा महामारी लक्षात घेता येणारा मोहरम सण साध्या पध्दतीने साजरा करावा कायदा-सुव्यस्थेची काटेकोर पालन करण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी केले आहे.
आज रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात मोहरम सणा निमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी मोहरम सण आणि कोरोना महामारीत सोशल डिस्टेंसिंग ठेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा महाराष्ट्र सरकार तसेच जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व सुचना प्रमाणे सर्व प्रकारचे मोहरम सणउत्सव साद्या पध्दतीने साजरे करावे तसेच मोहरम मिरवणूक काढू नये असे अवाहन निरिक्षक वाकोडे यांनी केले. बैठकीला साहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्यासह राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख यूसुफ खान गयास शेख यांच्यासह सर्व मुस्लिम पंच कमेटी सदस्य मौलाना उपस्थित होते.