प्रारंभिक मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन मेढे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्रातील कार्याला नवे बळ मिळाले आहे. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या आदेशानुसार व राज्याध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या शिफारशीनुसार मोहन मेढे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संघटनेच्या तालुका शाखेची बैठक मोहन मेढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीमध्ये संघटनेचे सचिव हकीम चौधरी यांनी मागील वर्षभरातील कार्याचा सविस्तर लेखाजोखा मांडला. विविध महिला अत्याचार प्रकरणांवर वेळेवर प्रतिक्रिया देऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यात संघटनेने घेतलेल्या पुढाकाराची विशेष चर्चा झाली. मोहन मेढे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक अ. फ. भालेराव, पत्रकार संदीप जोगी आणि संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन वर्षासाठी निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नूतन ओळखपत्रांचे वाटप मेढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित साहित्यिक डॉ. अ. फ. भालेराव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क बहाल केले असून, प्रत्येकाने संविधानाचे वाचन करून त्यातील अधिकारांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.” त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रती देण्याचे आश्वासनही यावेळी दिले.

बैठकीस तालुका शाखेचे जगन्नाथ चांगदेवकर, बी. डी. गवई, एन. जी. शेजोळे, विजय खराटे, रामदास मिस्त्री, भारती लोखंडे, धनंजय सापधरे, चंद्रकांत रावाये, राजेंद्र वानखेडे, पत्रकार आतिक खान, प्रमोद सौंदळे, राजेश चौधरी, संदीप जोगी, पंकज वंजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन हकीम चौधरी यांनी केले तर आभार विजय खराटे यांनी मानले.

Protected Content