Home राजकीय मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय – राहुल गांधी

मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय – राहुल गांधी


untitled 13 1542778435

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत. आम्ही गेलो होतो का, नवाझ शरीफला भेटायला आम्ही गेलो होतो का ? पठाणकोटमध्ये कोण आले होते, ते आयएसआयवाले, त्यांना आम्ही बोलावलं होतं का ? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदींना पाकिस्तानचा पोश्टर बॉय म्हटलं आहे. पाकिस्तानला मोदीच गेले होते, नवाझ शरीफ यांना त्यांनीच मिठी मारली होती. स्वत:च्या शपथविधी सोहळ्याला त्यांनीच नवाझ शरीफला आमंत्रण देऊन मोठं नाटक केलं, असे म्हणत राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी एअर स्ट्राईक संदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यास उत्तर देताना मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप त्यांनी केला. मी त्या प्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. मात्र, कालच मी बातमी वाचली. त्यामध्ये पुलमावा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याचं म्हटलं आहे. त्या पीडित कुटुंबीयांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसनेही त्याबाबत भूमिका घेतली आहे. भाजपाकडून काँग्रेस नेत्यांवर पोस्टर बॉय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत मी अधिक काहीही बोलू इच्छित नसल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound