केरळ (वृत्तसंस्था) राज्यातील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटेवर मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नोटेवरील धमकीचा संदेश हा मल्याळम भाषेत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ८ जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. विशेष त्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच ७ जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला होता. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते. यापूर्वी दोन जून रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजपा अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीने मोदींना मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, गुरूवायूर मंदिरामधील नोटेवर धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने याला गंभीरतेने घेत याची सर्व माहिती सुरक्षा संस्थेला दिली आहे. सुरक्षा संस्थेने त्यानंतर मोदी यांच्या सुरक्षेची तपासणी केली.