Home राजकीय मोदींनी देशाचे ३० हजार करोड रूपये चोरून अंबानींच्या घशात घातले : राहूल...

मोदींनी देशाचे ३० हजार करोड रूपये चोरून अंबानींच्या घशात घातले : राहूल गांधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे ३० हजार कोटी रूपये चोरून अनिल अंबानी यांच्या घशात घातल्याचा घणाघात आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल गांधी यांनी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय अधिवेशनातील आपल्या अखेरच्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

आज राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी राफेल कराराबाबत द हिंदू या वर्तमानपत्राने छापलेल्या माहितीच्या आधारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तेे म्हणाले की, राफेल करारात पंतप्रधान मोदी हे समांतर डीलींग करत होते. त्यांनी देशवासियांचे ३० हजार करोड रूपये चोरून अनिल अंबानी यांना दिले. यामुळे चौकीदार हाच चोर असल्याचा पुनरूच्चार राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा केला. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानी यांचे प्रतिनिधी असल्याचा टोलादेखील त्यांनी मारला. केंद्र सरकार रॉबर्ट वाद्रा, पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करत आहे. ही चौकशी झालीच पाहिजे. मात्र राफेल कराराबाबत का बोलले जात नाही? असा प्रश्‍न राहूल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound