Home राजकीय मोदींनी जनतेला मुर्ख समजणे बंद करावे; प्रियंका गांधी यांचा पलटवार

मोदींनी जनतेला मुर्ख समजणे बंद करावे; प्रियंका गांधी यांचा पलटवार


download 8

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, गेल्या 5 वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगद्वारे काँग्रेसवर वंशवादाचा-घराणेशाहीचा आरोप केला. मोदींचा वंशच नसल्याने ते वंशवादावर कसे भाष्य करु शकतात? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी केला आहे. ब्लॉगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आरोपावर काँग्रेसकडूनही पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेसने मोदींवर वैयक्तिक आरोप केले आहेत.

ज्यांचा कुठला वंशच नसेल तर ते वंशवादावर कसे काय बोलू शकतात? घराणेशाही संपूर्ण जगात सुरु आहे. जगात कुठलाच असा देश नाही जिथे आपला वंश पुढे नेला जात नाही. तसेच आपण असा एक व्यवसाय सांगा ज्यामध्ये लोक आपले घराणे पुढे घेऊन जात नाहीत. तीच गोष्ट राजकारणातही होत आहे, राजकारणात एखाद्या पक्षात जर घराणेशाही सुरु असेल तर त्या व्यक्तीचे योगदान पक्ष आणि मतदार लक्षात घेतील. इतर व्यवसायातही हाच प्रकार होत आहे. मात्र, मोदींना आपला वंशच पुढे वाढवायचा नाही, त्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टींवर राजकारण करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष – दोन विभिन्न दृष्टीकोन’ या मथळ्याखाली ब्लॉग लिहिला आहे. २०१४ च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडलं होतं. माध्यमांपासून संसदेपर्यंत, जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेले नाही, या घटनात्मक संस्थांचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत आहे, असे मोदींनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते.

मोदींच्या या ब्लॉगवर प्रियंका गांधी यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. “जितकी आमच्यावर टीका करणार, तितके आम्ही आणखी भक्कम होऊ. आम्ही कोणालाही घाबरत नाही”, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने देशाच्या प्रत्येक घटनात्मक संस्थेवर हल्ला केला, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound