नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झीट पोल्समध्ये मोदी सरकारला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कालखंडात एक्झीट पोल जाहीर करण्यावर बंदी घातलेली आहे. या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी सहा वाजता सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर विविध मतदानोत्तर कल चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. यातील बहुतांश कल हे भाजप व भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळणार असल्याचे संकेत प्रदान करणारे आहेत.
टाईम्स नाऊ-सीव्हीआर यांच्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला ३०६ तर युपीएला १३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. सी-व्होटरच्या चाचणीमध्ये एनडीएला २८७ तर युपीएला १२८ जागा मिळू शकतात. आज-तकच्या एक्झीट पोलमध्ये तर एनडीएला तब्बल ३५२ तर युपीएला फक्त ९२ जागा मिळणार आहेत. न्यूज १८ च्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला३३६ तर युपीएला ८२ जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज एक्सने मात्र एनडीएला २४२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस आघाडीला १६४ जागा मिळण्याची शक्यता आहे.