नवी दिल्ली (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा मिळवत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातमध्ये जाणार आहेत. आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे.
गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर सोमवारी मी वाराणसीत असेन. काशी ही महान भूमी आहे. येथील जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी जाणार आहे. दरम्यान, उद्याच्या गुजरात भेटीत पंतप्रधान मोदी काय बोलतात, याबद्दलही उत्सुकता आहे.