नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘जैश’चा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी हे शी जिनपिंगना घाबरले असून भारताविरुद्ध कृती करणाऱ्या चीनविरुद्ध कमकुवत मोदींच्या तोंडून एक शब्द निघाला नसल्याची टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झोके घेतात, दिल्लीत गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात. ही मोदींची ‘चीन नीती’ आहे, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘जैश’चा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. चीनने कायमच मसूदला पाठिशी घातले आहे. २००९, २०१६ आणि २०१७मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. यावरून राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींना लक्ष्य केले आहे. भारताविरोधात चीनचे केलेल्या कृतीवर मोदींनी एक शब्दही काढला नाही. कमकुवत मोदी चीनच्या शी जिनपिंग यांना घाबरले, अशी टीका राहुल यांनी केली.