नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली. अनेक वर्षानंतर मोदींवर विश्वास टाकत लोकांनी प्रचंड बहुमतात त्यांचे सरकार निवडून दिलं. सोशल मिडीयावरमोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
‘२०१९ वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक’ अहवालानुसार पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला ४.३५ करोड लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास १.३७ करोड लाईक्स मिळाल्या आहेत.
या अहवालानुसार मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला २.३० करोड लाईक्स आहेत. हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचं सांगण्यात आले आहे.
या अहवालानुसार तिसऱ्या नंबरवर क्वीन रानिया यांचा नंबर लागतो. जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी असलेल्या रानिया यांना १.६९ करोड लाईक्स आहेत. रानिया यांचे फेसबुकसोबत ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरही अकाऊंट आहेत. एक मार्चपर्यंत फेसबुकने केलेल्या अहवालानुसार फेसबुकच्या या सर्व पेजेसला मिळून ३४.५० करोड लाईक्स आहेत. तर पेजवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर ७६.७ करोड लाईक्स, कमेंट्स, शेअर्स झाल्या आहेत.