मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. मत्ते व संबंधित विषयातील विशेषज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यंदाच्या खरीप हंगामापासून शासनाने पीकपेऱ्याच्या नोंदणीसह कृषीविषयक इतर सर्व कामांसाठी ई पीक अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, आता ही अडचण दूर झाली असून, संकटातील शेतकऱ्यांच्या मदतीला आता कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थिनी माहिती देताना इ पीक पाहणी अॅप इ. प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२०२५. कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी कन्या प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे ह्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या