रावेरात मोबाईलचा स्फोट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष थोडक्यात बचावले

रावेर प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महमूद शेख यांचा रेडमी कंपनीच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. परंतू मोबाईलला पॅड असल्या कारणामुळे त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतू, या घटनेमुळे मोबाईल वापरकर्तेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेडमी १० कंपनीचा मोबाईल खिशात ठेवूण फिरण्यासाठी निघालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रावेर शहरध्यक्ष महेमुद शेख यांच्या खिशातुन अचानक धुर निघाला. त्यांनी खाली खिशाकडे बघितले असता मोबाईलमधुन धुर निघत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी क्षणाचीही विलंब न करता मोबाईल बाजूला फेकल्याने ते थोडक्यात बचावले आहे. यामुळे मोबाईल वापरकर्तेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

Protected Content