जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे महागडे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निखिल राजू मानके वय २० रा. धानवड ता. जळगाव आणि मयुर मांगू पाटील वय २० रा. चिंचखेडा ता. जळगाव हे मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक आवारात असतांना अज्ञात चोरट्यांनी दोघांचे महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी बुधवारी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे ह्या करीत आहे.




