बुलडाणा जिल्ह्यातही मोबाइल मेडिकल युनिट वाहन मंजूर (व्हिडिओ )

बुलढाणा, प्रतिनिधी । मोबाइल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागांची निवड करण्यात आली असून, बुलडाणा जिल्ह्यातही मोबाइल मेडिकल युनिट वाहन मंजूर झाले आहे.  या वाहनाची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहणी केली. 

 

 राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी  शनिवार २२  मे रोजी मोबाइल मेडिकल युनिट वाहनाची  पाहणी केली. हे मोबाइल मेडिकल युनिट वाहन  मेहकर, लोणार व खामगाव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/540645460264832

 

Protected Content