जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या मुलांच्या खोलीतून भल्या पहाटे अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल लांबविल्याचा प्रकार सकाळी रविवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान डोंगर पाटील रा. अजंता सिम ता.चोपडा आणि किरण निंबा पाटील रा. मोहिदा ता. चोपडा हे जयेश पाटील, कोमल पाटील आणि महेश पाटील असे एकूण पाच जण मिळून शिवकॉलनी परीसरातील विजय टॉवरजवळी एका अपार्टमेंटमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाड्याने राहत आहे. यातील सर्वजण जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी खासगी ठिकाणी कामाला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सर्वजण गप्पा मारत रात्री 11 वाजेच्या सुमारास झापले होते. दरम्यान महेश पाटील याचा कामाला जाण्याचे असल्याने सकाळी 6.30 वाजता उठला आणि दरवाजा उघडा ठेवून पाणी घेण्यासाठी खाली गेला. त्यावेळी अज्ञात चोरटा 6.30 वाजता गेटमधून घरात शिरला. त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. मात्र महेश पाटील हा जागा असल्याचे पाहून चोरट्याने काढता पाय घेतला. त्यानंतर महेश पाटील हा दरवाजा उघडा ठेवून कामाला निघून गेला. ही संधी पाहून चोरटा पुन्हा 6.47 वाजता पुन्हा खोलीत शिरला, त्यावेळी सर्वजण गाढ झोपेत असल्याचे पाहून समाधान पाटील आणि किरण पाटील यांनी चार्जींगला लावलेले 11 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले.
चोरटा सीसीटिव्हीमध्ये कैद
सकाळी दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाले असून लवकरच चोरटा रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान यापुर्वी किमान वर्षभरापूर्वी यांच्याच खोलीतून निलेश पाटील, जयेश पाटील आणि पुर्वी राहत असलेला मित्र सागर या तिघांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. त्यावेळी सुध्दा रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे पाहून अपार्टमेंट मालकांना अपार्टमेंटच्या आवारात चार सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे आज जी घटना झाली ती संपुर्ण सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. समाधान पाटील आणि किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत सुरू होते.