जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी जळगाव बसस्थानकावर घडला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भरत आण्ण पवार (वय-19) रा. सामनेर ता. पाचोरा हा जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. सामनेर ते ममुराबाद जळगावमार्गे रोज ये-जा करत करतो. शुक्रवारी 26 रोजी दुपारी महाविद्यालय सुटल्याने जळगाव बसस्थानकातून जळगाव पाचोरा बसमध्ये सामनेर येथे जाण्यासाठी दुपारी 3.30 वाजता बसला. जळगाव बसस्थानक ते इच्छादेवी चौकदरम्यान अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रूपयांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरला. याबाबत आज जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.