जळगाव प्रतिनिधी । नुतन मराठा महाविद्यालयासमोरील हौसिंग सोसायटी येथून मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास एलीसीबीच्या पथकाने शिरपूर येथून अटक केली असून कमलेश शालीक माळी (व-२७, रा. शिरपूर) असे चोरट्याचे नाव आहे.
हौसिंग सोसायटी येथील रहिवासी राजेश रघुवीर गुप्ता यांच्या घरातून ३१ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने महागडा मोबाईल चोरू नेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मोबाईल चोरटा शिरपूर येथे असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांना मिळाली़ त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, नारायण पाटील, बापु पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे यांना चोरट्याच्या शोधार्थ शिरपूर येथे पाठविण्यात आले होते़ गुरूवारी या पथकाने कमलेश माळी या मोबाईल चोरट्यास शिरपूर येथून अटक केली़ पूढील तपास शहर पोलीस ठाण्यातील विजयसिंग पाटील करीत आहेत.