यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भुसावळ ते अंकलेश्वर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांची दुरूस्तीची मागणी अनेक महिन्यांपासून सुरू असतांना देखील रस्ते दुरूस्त झालेले नाही. हा रस्ता दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावल-भुसावळ व बऱ्हाणपूरअंकलेश्वर राज्य मार्गावरील वाहनांच्या वर्दळीचा हा रस्ता असुन रस्तावर गेल्या अनेक दिवसापासुन ठीकठिकाणी मोठमोठी खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यात पाऊसाचे पाणी साचल्याने हे रस्ते खड्डेमय अपघातास आमत्रंण देणारे झाले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या रस्त्यावर वाहनधासकांचे अपघात होवु लागले आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देत आठ दिवसात हा धोकेदायक रस्ता दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलतांना दिला आहे. यावेळी मनसेचे यावल अध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी उपस्थित होते.