मनसे विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवणार – राज ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्य व्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले. तसेच विधानसभेसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिली आहे. मी कोणाकडे जागा मागणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केले. महायुतीसोबत जाणार की नाही? यावर मनसेचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Protected Content