जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शाखेचं आणि नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार व मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी अनिता कापुरे यांची मनसे महिला शाखेच्या अध्यक्षपदी, तर लक्ष्मी भिल यांची उपशाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या भाषणात महिला शाखेच्या कार्याचं कौतुक केलं. तसेच, हरीविठ्ठल नगरातील हे नवीन कार्यालय परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मनसेच्या कार्याला बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आणि महानगराध्यक्ष किरण तळेले यांचीही उपस्थिती होती. त्यांनी मनसेची भूमिका, कार्यपद्धती आणि जनतेसाठीची ध्येयधोरणं स्पष्ट केली.

यावेळी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाकभाई सय्यद, ॲड. सागर शिंपी, साजन पाटील, सतीश सैंदाणे, संदीप मांडोळे, दीपक राठोड, पंकज चौधरी, ऐश्वर्या श्रीरामे, अनिल दिघे, अविनाश जोशी, राहुल चव्हाण, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, तसेच आशुतोष जाधव, रोहिदास मिस्तरी, खुशाल ठाकूर, निलेश खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचं आयोजन उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केलं होतं, तर सूत्रसंचालन ललित शर्मा आणि श्रीकृष्ण मेंगडे यांनी केलं. आभार प्रदर्शन महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी केलं. मनसेने जळगावात आपला पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं दिसतंय.



