Home क्राईम मनसे नेत्याच्या मुलाचे महिलेसोबत असभ्‍य वर्तन ; गुन्हा दाखल

मनसे नेत्याच्या मुलाचे महिलेसोबत असभ्‍य वर्तन ; गुन्हा दाखल


मुंबई- लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा ।  मुंबईच्या रस्त्यांवर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांना हादरवून सोडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने अर्धनग्न अवस्थेत, मद्यधुंद होऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री राजश्री मोरेच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच बाचाबाची झाली आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजश्री मोरे हिने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. तिने आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून, या घटनेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोपही केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी तिने मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे. ज्यामध्ये ती म्हणाली होती, “मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा, त्यांच्यात काम करण्याची मानसिकता नाही.” या विधानांमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं आणि मराठी प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.

सध्या आंबोली पोलिसांनी राहिल शेखविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु असून नागरिकांत मनसे नेत्याच्या मुलाच्या वर्तनाबाबत तीव्र संताप आहे.


Protected Content

Play sound