Home राजकीय ‘मनसे’ आता झाली आहे ‘उनसे’ : मुख्यमंत्र्यांनी केली बोचरी टीका

‘मनसे’ आता झाली आहे ‘उनसे’ : मुख्यमंत्र्यांनी केली बोचरी टीका


devendra fadnavis raj thackeray 1

नांदेड (वृत्तसंस्था) काय अवस्था आहे, त्या राज आणि त्यांच्या मनेसेची, मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे झाली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले आहेत. म्हणजे, रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

 

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नांदेडच्या भोकरमधील सभेत त्यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाड्याने आणला, काल नेता भाड्याने आणला. नवी पॅटर्न तयार केलाय अशोक चव्हाणांनी समर्थन मिळवण्यासाठी, असे म्हणत अशोक चव्हाण यांच्यावरही फडणवीस यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असे त्यांनी यावेळी सांगितले. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही 2,226 कोटी थेट शेतकऱ्यांना दिले, हे तुम्ही कसे विसरता? असाही सवाल यावेळी फडणवीस यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound