यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल-भुसावळ मार्गावरील दरम्यानच्या निमगाव ते अंजाळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असुन , या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून या विषयाकडे यावलच्या सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येत्या आठ दिवसात रस्ता न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मनसेतर्फे यावल कार्यालयास येथे देण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल ते भुसावळ मार्गादरम्यान निमगाव पासुन अंजाळे गावापर्यंतच्या सुमारे चार किलो मीटर पर्यंतच्या रस्त्याची मागील काही वर्षापासून अत्यंत वाईट झालेली आहे.
यामुळे या मार्गाने जाणाऱ्या गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्ण वाहून जाणाऱ्या रूग्णवाहीका, शाळेतील विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बस व आदी वाहनांना या जीवघेण्या रस्त्याने वाहतूक करावी लागते, दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक-दोन वर्षात थातुरमातुर देखाव्याची निकृष्ठ प्रतीची दुरूस्ती करण्यात येते व काही दिवसांनी हा रस्ता पुनश्च खड्डेमय होवुन जैसे थे अवस्थेत येतो व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येत्या आठ दिवसात या खड्डेमय झालेल्या रस्त्या दुरुस्ती न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल रास्ता रोको आंदोलन करण्यात येइल असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, उपजिल्हा संघटक अजय तायडे, तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, यावल शहराध्यक्ष गौरव कोळी, शहर उपाध्यक्ष कुणाल बारी, भुसावळचे प्रतिक भंगाळे यांच्या स्वाक्षरी आहे .