मुक्ताईनगर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे प्रवर्तन चौकात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात चौकात महात्मा फुले, शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर, जमील देशपांडे, राहुल काळे, मधुकर भोई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदाधिकारीसहित अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार, श्रीफळ फोडून जल्लोषात व आनंदात शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
उपस्थित मनसे उपाध्यक्ष राहुल काळे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई, पदाधिकारी श्रीराम भोई, रोशन कपले, मंगेश कोळी, सुनील कोळी, सामाजिक कार्यकर्ता खामखेडा सरपंच पुंडलिक तायडे, मनीष खडसे,विवेक पाटील, गौरव दाणी, सचिन पाटील, पंकज बोहर्डे, धीरज पाटील, भूषण कोळी, मुकेश झाल्टे, मयूर यमदरे, निखिल झनके, सुनील गायकवाड, कडू झाल्टे, प्रसाद पदशिवे, पंकज मोरे, गजानन पाटील, यश पाटील, कुंदन कोळी, मनसे असंख्य सैनिक उपस्थित होते.