
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘निष्ठा दहीहंडी’ महोत्सवाच्या ट्रॉफीचे अनावरण शिवसेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते नुकतेच नाशिक येथे झाले. युवा सेना उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीदरम्यान हा छोटेखानी परंतु महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला.

नाशिक येथे उत्साहात पार पडलेल्या या बैठकीप्रसंगी जळगाव युवा सेनेच्या वतीने आयोजित ‘निष्ठा दहीहंडी’ महोत्सवाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘निष्ठा दहीहंडी’ उत्सव समितीचे अध्यक्ष अमित जगताप आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आ. सरदेसाई यांना दहीहंडी उत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली. हा दहीहंडी उपक्रम सुरू झाल्यापासूनचे हे तिसरे वर्ष असून, सरदेसाई यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
याप्रसंगी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य योगेशजी निमसे, सिद्धेशजी शिंदे, विस्तारक प्रवीण चव्हाण, विस्तारक भूषण मुळाणे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, निष्ठा दहीहंडी उत्सव समिती अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी अमित संजय जगताप, उपाध्यक्ष अंकित कासार, सचिव गजेंद्र कोळी, महानगर प्रमुख यश सपकाळे, हर्षल मुंढे, जय मेहता, निलेश जोशी, सौरभ चौधरी, रोहन सपकाळे यांच्यासह युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अनावरण सोहळ्यामुळे जळगावात होणाऱ्या निष्ठा दहीहंडी उत्सवाला अधिक बळकटी मिळाली असून, युवा सेनेच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.



