चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील आमदार उन्मेष पाटील यांनी आज (दि.९) वरखेडे-लोंढे प्रकल्पाला भेट देत पाहणी केली व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली. याप्रसंगी सभापती दिनेश बोरसे, आदर्श शेतकरी बाळासाहेब राऊत, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, नरेंद्रकाका जैन, विस्तारक गिरीश बराटे हे उपस्थित होते.
या पावसाळ्यातच प्रकल्पात पाणी अडवण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. सदर प्रकल्पामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसमृद्धी येणार आहे, सोबतच गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने गिरणा खोऱ्यातील परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प परिसरात जलसमृद्धीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण ठरणार आहे.