Home धर्म-समाज टी. राजा सिंह यांना अटक करणाऱ्यांच्या चौकशीची यावल येथे मागणी

टी. राजा सिंह यांना अटक करणाऱ्यांच्या चौकशीची यावल येथे मागणी

0
79

WhatsApp Image 2019 05 09 at 1.43.47 PM

यावल( प्रतिनिधी) तेलंगणा राज्यातील भाग्यनगर महापालीकेच्या कार्य क्षेत्रात अनधिकृत मास्जिदीचे बांधकाम थांबविण्यास गेलेल्या हिन्दुत्वनिष्ठ नेता टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आल्याच्या निषेध व्यक्त करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे निवेदन यावल येथील समस्त हिंदूत्वादी संघटनाच्या वतीने राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

 

आज सकाळी अकरा वाजता समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातुन यावलचे निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना निवेदन देण्यात आले. हिंदुत्ववादी विचारसरणीचे आमदार टी राजासिंह यांना पोलीसांनी अटक केली, या सर्व प्रकरणात सहभागी असलेले पोलीस अधिकारी, अनधिकृतपणे मस्जिदीचे निर्माण करणारे, व या सर्व घटनेला समर्थन देणारे यांची चौकशी होवुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन करण्यात आली असून या निवेदनावर निलेश महाजन, हर्षल बऱ्हाटे, धिरज भोळे, शिवाजी बारी, दिपक वाघ, व्यंकटेश बारी, विलेश भोईटे,निखिल देठे, कुणाल बडगुजर, किरण कोळी, प्रशांत बारी, सचिन वानखेडे, विनोद दौलत कुंभार, विशाल राजेन्द्र बारी, पवन नन्नवरे, आकाश राजु कोळी ,हरीष पाटील, चेतन भोईटे, हेमंत देवरे, तुषार कोळी यांच्या स्वाक्षरी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound