रावेर प्रतिनिधी | औंरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजीटल सदस्य नोंदणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कॉग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी यांना औंरंगाबाद ग्रामीण भागाच्या ‘निरीक्षक पदा’ची जबाबदारी सोपवली आहे.
औंरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजीटल सदस्य नोंदणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले गेले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी यांना औंरंगाबाद ग्रामीण भागाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली.
आज सोमवार, दि.२४’ जानेवारी रोजी ‘डिजिटल सदस्य नोंदणी शिबिरा’चे उदघाटन आ.चौधरींच्या हस्ते औरंगाबाद मध्ये संपन्न झालं. औंरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ कल्याणराव काळे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, महिला जिल्हाध्यक्ष हेमाताई पाटील यांच्यासह औरंगाबाद जिल्हातील तालुकाध्यक्ष फ्रंटलचे अध्यक्ष, काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.