आ. संजय सावकारे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी आज नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज सकाळीच त्यांना पक्षाकडून मंत्रिपदासाठी फोन आलेला होता, त्यामुळे आज भुसावळ शहरात त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी पेढे भरून एकच जल्लोष केल्याची पाहायला मिळाले.

आमदार संजय सावकारे हे भुसावळ मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. संजय सावकारे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर २००९ साली निवडून आले होते. त्यावेळी त्यांना पहिल्यादाच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली होती. त्यानंतर २०१४ विधानसभा निवडणूकी पुर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपच्या चिन्हावर आमदार लढविली आणि जिंकली सुध्दा. त्यानंतर सातत्याने २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहे. सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहे. भुसावळच्या इतिहासात सलग चौथ्यांदा निवडून येणारे संजय सावकारे हे पहिले आमदार आहेत.

Protected Content