पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उद्या जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत भडगाव व पाचोरा तालुक्यासह जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार उद्या दिनांक २४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत. ते सकाळी कजगाव (ता.भडगांव) येथे येणार आहेत. येथे सकाळी दहा वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे. यानंतर नगरदेवळा येथे अँबुलन्स लोकार्पण सोहळा होईल. यानंतर ते कृष्णापुरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माल्यार्पण करणार आहे. तसेच पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये सदिच्छा भेट घेऊन नंतर महालपुरे मंगल कार्यालयात १२.३० वाजता आयोजित युवा संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.
आ. रोहित पवार हे डॉ.भुषण मगर यांच्या निवास स्थानी भोजन करणार असून ते नंतर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट देऊश्र शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर ते शेंदुर्णी येथील विघ्नहर्ता हॉस्पीटलला भेट देतील. तर रस्त्यात पहुर व नेरी गावात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मग जैन हिल जळगांव येथे आगमन करतील. यानंतर ते माजी मंत्री गुलाबराव देवकर कॉलेज येथे भेट देतील. यानंतर ते अल्प बचत भवनात आयोजित भारतीय संविधान व नागरीक सत्य शोधक साहित्य परिषदेत मार्गदर्शन करतील. यानंतर ते दिपस्तंभ फाऊंडेशन व बहीनाबाई चौधरी संग्रालय येथे भेट देणार आहेत. तर सायंकाळी शिवतीर्थ मैदान,जी.एस.ग्राऊंड येथे डॉ भूषण मगर पाटील युवा फाऊंडेशन तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हिल चेअर वाटप करून ते औरंगाबाद कडे रवाना होणार आहेत.