जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कोणत्याही समाजाच्या, जातीच्या आणि कुठल्याही नागरिकाने केलेल्या अडीअडचणी आ.राजुमामा भोळे समजून घेतात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे आ.भोळे यांनाच पुन्हा आमदार करणार असा विश्वास पिंप्राळा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांचा प्रचार दौरा बुधवारी पिंप्राळा परिसरात पार पडला. पिंप्राळा येथील आई भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी प्रचाराला सुरुवात केली. ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला.
प्रचार रॅलीत यांनी घेतला सहभाग
रॅलीत आ.राजुमामा भोळे यांच्या प्रचारार्थ आ.चंदूभाई पटेल, मनपा गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक आबा कापसे, सुरेश सोनवणे, शोभाताई बारी, कुलभूषण पाटील, प्रतिभा देशमुख, मयुर कापसे, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, सरिता नेरकर, पार्वताबाई भील, चेतन सनकत, सचिन पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील, विजय पाटील, मनोज आहुजा, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अमर जैन, सरिता माळी, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, पूनम नाथ, प्रताप बनसोडे, प्रतिभा भालेराव, राजू मोरे, भाजपच्या शरिफा तडवी, रेखा पाटील, निला चौधरी, सागर पाटील, जितेंद्र चौथे, महेश पाटील, कैलास सोमाणी, दीपक पाटील, महेश ठाकूर, जयेश ठाकूर, राहुल पाटील, सम्राट सपकाळे, यांच्यासह भाजपा, शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
संत मिराबाई नगरात रॅलीचा समारोप
भवानी माता मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मध्ये तलाठी कार्यालय, गणराज हॉटेल, आनंदमंगल कॉलनी, बँक कॉलनी, निसर्ग कॉलनी, मयुर कॉलनी, आझाद नगरमार्गे संत मिराबाई नगरात रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारी 4 वाजता नगरसेवक मयुर कापसे यांच्या निवासस्थानापासून रॅलीला सुरूवात करण्यात आली. पुढे दांडेकर नगर, ओमशांती नगर, साईबाबा मंदिर, मानवशाळा, गुजराल पेट्रोल पंप, मानराज पार्क मार्गे हनुमान मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला. पिंप्राळा परिसरातील आठवडे बाजार बुधवारी होता. महायुतीचे उमेदवार आ.राजुमामा भोळे यांची प्रचार रॅली सायंकाळी बाजारातून जात असताना विक्री आणि खरेदी करणार्या नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. आ.भोळे यांचे यावेळी जंगी स्वागत करून विजयासाठी आशिर्वाद देण्यात आला.