जळगाव महापालिका निवडणूक प्रमुखपदी आ. राजूमामा भोळे यांची नियुक्ती !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक प्रमुखपदी आमदार राजूमामा भोळे यांची नियुक्ती केली आहे.

गुरूवारी दुपारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी जळगाव महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली. यानंतर काही तासांमध्ये जळगाव महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून आमदार राजूमामा भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे.

यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेतील महायुतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यातच 23 डिसेंबर पासून निवडणुकीचे अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असला तरी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नावे शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येतील याची शक्यता बळावली आहे.