मुंबई, वृत्तसंस्था | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सायंकाळी भाजपचे नेते व आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
हंगामी अध्यक्ष कोळंबकर आता सगळ्या नव्या आमदारांना पदाची शपथ देतील. त्यानंतर दुसऱ्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.