Home Cities पाचोरा आ. किशोर पाटील यांना मनसे आणि दलित सेनेचा पाठिंबा

आ. किशोर पाटील यांना मनसे आणि दलित सेनेचा पाठिंबा


kishor patil

 पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना भाजपाचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या कामाची दखल घेत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दलित सेना’ यांनी निवडणुकीत जाहिर पाठिंबा दिला आहे.

गेल्या पाच वर्षांत विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी चांगले काम केले सोबत प्रचारादरम्यान नगरदेवळा रेल्वेस्टेशनजवळ निंभोरा येथे माधवराव पाटील यांच्या अपघाताने मृत्यू झाला त्या गरीब कुटुंबावर मोठा आघात झाला. आ. किशोर पाटील हे प्रचारात व्यस्त असतांना कुटुंबियांना मदत केली म्हणून भडगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उपजिल्हाप्रमुख अनिल वाघ यांनी निवडणुकीत जाहिर पाठिंबा दिला. तर दुसरीकडे दलित सेनेचे अध्यक्ष राजूभाई जावरे यांनी देखील किशोर पाटील यांना पाठींबा देत आ. पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेवून निवडून देण्याचा निर्धार केला आहे.


Protected Content

Play sound