जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यामध्ये जामनेर मतदार संघातून सातव्यांदा निवडून आलेले आमदार गिरीश महाजन हे आता तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जामनेर मतदारसंघातून सलग सातव्यांदा गिरीश महाजन हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते घेण्यात आलेले होते. २०१९च्या विधानसभेत निवडून आल्यानंतर महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपद भूषवित आरोग्य शिक्षण मंत्री याची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद देखील देण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सातव्यांदा विजय झालेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात गिरीश महाजन यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून आज तिसऱ्यादा शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.