एरंडोल प्रतिनिधी । पंचायत समितीकडून दिवाळीनिमित्त बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी पंचायत समिती मार्फत विक्री केंद्राचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाला आमदार चिमणराव पाटील यांनी भेट देऊन काही साहित्य खरेदी केले.
या विक्री केंद्रात पंधरा बचत गटांच्या महिलांनी भाग घेऊन त्यांनी तयार केलेले साहित्य प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले. या प्रदर्शनाला आमदार चिमणराव पाटील यांनी भेट देऊन काही साहित्य खरेदी केले व बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहित केले या कार्यक्रमाचे नियोजन एरंडोल पंचायत समितीकडून करण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण बचत गटाचे सहाय्यक प्रशासक लोकेश जोशी, एरंडोल तालुका व्यवस्थापक गुलाब चव्हाण,दीक्षा अडकमोड यांनी बचतगटांना मार्गदर्शन केले.