मुक्ताईनगर – कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे या मोहिमेतील चित्ररथाला शनिवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राशी सीड्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण याविषयी जनजागृती मोहीम राबविली जात आहे कापूस या नगदी पिकावर भविष्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन व मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे हा धोका होऊ नये म्हणून कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे या मोहिमेला तालुक्यातील बेलवाडी करती कोठे अंतुरली लोहार खेळा नायगाव उचंदा मॅड सांगवी पुरणार खामखेडा या गावांमध्ये पहिल्या फेरीत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल तर कोथळी सालबर्डी हरताळा माळेगाव सारोळा निमखेडी खुर्द सातोड रुईखेडा तरोडा व भांडवले या गावांमध्ये जागृत जनजागृती करण्यात आली आहे तर उर्वरित तालुक्यातील इतर सर्व गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे
शेतकऱ्यांनी कपाशीवरील बोंड आळी चे सूक्ष्म निरीक्षण करून तातडीने उपाययोजना करावी कीड नियंत्रण फवारणी करावी असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे