जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजूमामा भोळे यांनी शहरात जनसंवाद व जनजागृती अभियान सुरू केले आहे.
यासाठी भाजपाचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांमध्ये जावून जनसंवाद व जनजागृती बाबत फार्म भरून घेतले जात आहे. क्षितिज फाऊंडेशने अध्यक्ष गजानन वंजारी, अविनाश पारधे यांनी गायत्री नगर, श्रीकृष्ण कॉलनी, रिंगरोड, मेहरूण परीसरात नागरीकांशी संवाद साधुन त्यांच्याकडून जनसंवाद व जनजागृती अर्ज भरून घेतला. या अभियानास नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.