अमळनेर प्रतिनिधी । आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण व जिल्हा मार्ग यासाठी ६ कोटी २० लाख रुपयांच्या कामास ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अमळनेर तालुक्यातील तीन रस्त्यांचा यात समावेश आहे. आमदार अनिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या कामांना मंजुरी दिली आहे.
यात अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्रामीण मार्ग या नवीन कामासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर शहापूर या नवीन ग्रामीण मार्गासाठी ४० लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबत, मंगरूळ ते फाफोरे रस्ता ग्रामीण मार्ग नवीन कामासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात येतो. जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषदेकरिता गट (ब)मधील ६ कोटी २० लाख रुपये किमतीच्या कामास परिशिष्ट क्रमांक १ व २ अन्वये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
Mla Anil Patil, Amalner Sanctions Work Of Three Roads In Taluka